नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या नाशिकमध्ये पावसात इलेक्ट्रीक पोलचा वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने सायकलस्वार तरूण ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार रात्री नऊ वाजेच्या सुमारास घङली. बबलू खान (वय २३, राहणार नानावली, जुने नाशिक मूळ गाव अकबरपुर, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पावसामुळे काजी कब्रस्तान समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे विद्युत खांबात करंट उतरला होता. बबलू खान हा तरूण बेकरी पदार्थ विक्रीचे काम करतो. तो सायकलीने जात होता. अचानक त्याचा हात त्या खांबावर लागल्यामुळे त्याचे निधन झाले. तो नानावली भागातील फेमस बेकरीत मध्ये कामाला होता. अशी माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहकले यांनी दिली.