दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील वणी गावात कोळवाडा परिसरात एका महिलेने दोन वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला अगोदर गळफास लावला त्यानंतर तीने सुध्दा गळफास घेऊन आत्महत्या केली.
सासरहून माहेरी आल्यानंतर तीने हे टोकाचे पाऊल उचलले. सविता विकास कराटे आणि तनुजा विकास कराटे अशी मायलेकींची नावे आहेत. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही.
मंगळवारी सकाळी सविता हिने आई घरी नसतांना मुलीसह आयुष्य संपवीले. नळाला पाणी आल्याने आजूबाजूच्या महिला पाणी भरत असतांना सविता दिसत नसल्यामुळे त्यांनी सविताला आवाज दिला. पण त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी शेजारी राहत असलेल्या उत्तम इंगळे यांना सांगितले.
इंगळे यांना मुलगा तुषार यास पाहण्यासाठी पाठवले असता आतून दरवाजा बंद होता. तेव्हा दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता सविताने गळफास घेतल्याचे समोर आले.