नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – गुजरात राष्ट्रीयमहामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात पामतेल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रकमधील तेलाचे पाकीट फुटल्याने मोठे नुकसान झाले. गुजरातकडून नाशिककडे हा ट्रक पामतेल घेऊन जातांना हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तेल पॅकेट बाजूला करण्यासाठी मदत केली.