इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेश मधील अनकापल्ले येथील अच्युथापुरम सेजमधील एका फार्मा कंपनी प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू झाला तर ३३ हून अधिक जण जखमी झाले आहे. हा स्फोट शॅार्टसर्किटमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कंपनीत ३८१ कर्मचारी दोन शिप्टमध्ये काम करतात. दुपारी जेवणाच्या सुट्टीत हा स्फोट झाला त्यावेळी कर्मचा-यांची उपस्थिती कमी होती. स्फोट इतका भीषण होता की इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अनकापल्ले जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, या अपघातातील जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.