नाशिक – व्दारका परिसरातील संतकबीर नगर येथील झोपडपट्टीत गॅस सिंलेडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीनंतर अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून ते आग आटोक्यात आणत आहे. या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे. सायंकाळी ५ वाजता ही आग लागली. आग लागलेल्या ठिकाणी झोपडपट्टी असल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अडचणी आल्या.
व्दारक परिसरात आमदार देवयानी फरांदे यांना आगेची बातमी कळताच त्यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन नाशिक महानगरपालिकेचे पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांना अगनिशमक दलाचे वाहने पाठविण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना आगेच्या घटनेची कल्पना देऊन आवश्यक वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश दिले. या लागलेल्या आगेच्या घटनेत अनेक झोपड्यांचे नुकसान झाले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सदर ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांना दिले. अधिक नुकसान झालेल्या परिवारांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असलयाचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.