शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

त्र्यंबकेश्वर येथे दुसर्‍या श्रावण सोमवारी सुध्दा शिवभक्तांची प्रचंड गर्दी

ऑगस्ट 8, 2022 | 6:15 pm
in स्थानिक बातम्या
0
DSC 0336 e1659962669704

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रावण सरी अंगावर झेलत हजारो भाविकांनी आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहिल्या सोमवारी सुध्दा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी सकाळी शहरी नागरीकांनी प्रदक्षिणेचा लाभ घेतला. रविवारी दिवसभर पावसाने छान उघडीप दिली. मात्र संध्याकाळी सात पासून पावसाने जोर पकडला. रविवारी रात्रीपासूनच प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरु झाली. अभंग गात, बम बम भोले चा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते. पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली.

पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून पेड दर्शन व नेमून दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. धर्मदर्शन रांग थेट बडा उदासी आखाड्यायर्यंत गेली होती. देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. खासगी वाहनांना याही सोमवारी गावात प्रवेशबंदी होती. त्यामुळे श्रीसंत गजानन महाराज चौकात नाशिकबाजुकडे व जव्हार बाजुकडे खाजगी वाहनांची गर्दी झाली होती.

दुपारी ठिक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती चिन्मय फडके यांनी पूजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणुन समीर दिघे, मंगेश दिघे, संजय दिघे, कुणाल लोहगावकर, गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली.

या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भूषण अडसरे, तृप्ती धारणे यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. एकादशी व श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली. पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपअधिक्षक कविता फडतरे, पोलीस निरिक्षक संदीप रणदिवे, पो.ऊ.नि. अश्विनी टिळे व सहकार्‍यांनी यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘तू हॉट दिसतेस’, ललित मोदींची सुष्मिता सेनच्या स्वीम सूट व्हिडिओवर कमेंट

Next Post

८ वर्षांनी घडविला इतिहास! जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत लक्ष्य सेनने जिंकले सुवर्णपदक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
FZovqJBWIAEKHBF

८ वर्षांनी घडविला इतिहास! जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत लक्ष्य सेनने जिंकले सुवर्णपदक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011