नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आइस्क्रिम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचे इलेक्ट्रीक शॅाक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उंटवाडी येथे राहणारी ही मुलगी रात्री आइस्क्रिम घेण्यासाठी दुकानात आपल्या पालकांसोबत गेली होती. त्यावेळेस हा फ्रिजचा शॅाक लागल्याचे बोलले जात आहे. गरिष्मा विशाल कुलकर्णी असे मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ च्या आसपास घडली. या घटनेप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करत आहे.
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1565663437363232773?s=20&t=H4rCZwqN_ihqKcdqiRriWQ