मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदरच्या आयुष्यावर बनवण्याच्या चर्चेवर एक ट्वीट करत इशारा दिला आहे. अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे.
सीमा हैदरवर अमित जानी चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. त्या चित्रपटाचं नाव कराची टू नोएडा असे ठरल्याचे बोलले जाते. त्यावर खोपकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अमेय खोपकर ट्वीटरवर पोस्ट शेअर करत सांगतिले की ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत ? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’
A film on the life of Seema Haider; MNS tweeted this warning