मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे दोन वळूची जोरदार झुंजीचा थरार पाहायला मिळाला. दत्त मंदिराकडून गुरुव्दाराच्या पाठीमागून जाणाऱ्या रस्त्यावर दोन वळू एकमेकांना भिडले. त्यांच्या झुंजीमुळे वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी ही झुंज सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या झुंज सुटत नसल्याने अखेर पालिकेच्या अग्निशमन वाहनातून या भिडलेल्या वळुंवर जोरदार दाबाने पाण्याचा फवारे मारण्यात आले.
त्यानंतर तासभराच्या अथक परीश्रमानंतर झुंज सुटून वळू पळून गेले. या झुंजीचा थरार बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. दरम्यान मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मनमाड येथे मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत असते. पण, कोंडवाडाच नसल्यामुळे या जनावरांवर नेमकी काय कारवाई करावी असा प्रश्न नगर परिषदेला पडला आहे.
A fierce fight between two bulls in Manmad
Nashik District