अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला सण, उत्सवाची रेलचेल सुरू झाल्याच पहावयास मिळते, सण व उत्सवाची परंपरा जपणाऱ्या येवला शहरात नागपंचमीच्या दिवशी चक्क जत्रा भरत असते. तीही गेल्या अनेक वर्षांपासून, शहरातील गंगादरवाजा भागात नागदेवतेचे छोटेसे मंदीर असून नागपंचमीच्या दिवशी शहरातील महिला वर्ग याठिकाणी नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत गर्दी करीत असतात,जोडीलाच बाजूला असलेल्या महाविद्यालयाच्या मोकळ्या जागेत विविध वस्तूंची दुकाने, मनोरंजनासाठी विविध खेळ, पाळणे अशी एक दिवशीय जत्राच भरत असल्याने खऱ्या अर्थाने नागपंचमीचा सण या शहरात उत्सहात साजरा केला जातो. त्यामुळे येवल्यात परंपरा आणि संस्कृती जपल्याचे येथे पहावयास मिळते.