रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची घेतली भेट; हे आहे कारण

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2022 | 10:51 am
in राष्ट्रीय
0
Draupadi murmu

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्‍ट्रपती भवनामध्‍ये भेट घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीला उपस्थित राहण्‍यासाठी हे शिष्‍टमंडळ भारतामध्‍ये आले आहे. ही बैठक मुंबई आणि दिल्ली येथे २८-२९ ऑक्टोबरला आयोजित केली होती.

शिष्टमंडळाच्या सदस्यांचे स्वागत करताना, बैठकीच्या प्रारंभी मुंबईतील २६-११ च्या बॉम्बस्फोटामध्‍ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, जगातील सर्वात मुक्त आणि वैविध्यपूर्ण समाज असलेला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मात्र अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरला आहे. दहशतवादासारख्‍या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात, आणि अशा सर्व प्रकारच्या प्रकटीकरणाच्या विरोधात लढण्यासाठी भारताची राष्ट्रीय वचनबद्धता आहे. दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याबद्दल शून्य सहिष्णूता, त्यामागे असलेल्या प्रेरणांचा विचार न करता, जागतिक दहशतवादविरोधी संरचनेला आकार देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा मार्गदर्शक दृष्टीकोन असला पाहिजे, यावर राष्‍ट्रपतींनी भर दिला.

या बैठकीच्या वेळी, संयुक्त राष्‍ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी, राजदूत रुचिरा कंबोज यांनी दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा म्हणून, राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या (यूएनएससी सीटीसी) कार्याबद्दल आणि या समितीने दिलेल्या प्राधान्यक्रमाबद्दल माहिती दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौसा अ‍ॅडमो, गॅबनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही संक्षिप्त स्वरूपामध्‍ये यूएनएससी सीटीसीच्‍या महत्वाच्या पैलूंबद्दल आणि आज दिल्लीतील बैठकीत स्वीकृत केलेल्या घोषणापत्रातील पुढील मार्गांबद्दल राष्‍ट्रपतींना माहिती दिली.

या बैठकीला उपस्थित मान्यवरांमध्ये घानाच्या परराष्ट्र मंत्री, सन्माननीय महोदया शर्ली अयोर्कर बॉचवे, यूएईच्या आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री सन्‍माननीय महोदया रीम इब्राहिम अल हाशिमी, आणि अल्बेनियाच्या उपपरराष्ट्रमंत्री महोदया मेगी फिनो, संयुक्त राष्ट्र संघाचे वरिष्ठ अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघाचे दहशतवाद विरोधी कार्यालयातील ‘अंडर सेक्रेटरी जनरल’ व्लादिमीर वोरोन्कोव्ह यावेळी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …हाच एक सुलभ व खराखुरा मार्ग आहे.

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५६३ कुटुंबाला अशी मिळाली ‘उभारी’

Next Post
IMG 20221030 WA0114 1 e1667108590606

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५६३ कुटुंबाला अशी मिळाली ‘उभारी’

ताज्या बातम्या

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011