इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क-
नुकतेच पॅरीस येथे आयोजित करण्यात आलेले ऑलिम्पीक पार पडल्यानंतर भारतात साजरा होत असलेल्या १५ ऑगस्ट २०२४ या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नाशिकच्या मनाली देवरे आणि रुचिता कुमट या दोन तरुणींनी ऑलिम्पीक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना आपल्या नृत्यकलेच्या माध्यमातून एक अनोखी भेट दिली आहे.
‘इन्स्टाग्राम’ या सोशल मिडीयावर या दोघींनी ‘रंग दे बंसती’ या चित्रपटातील ‘थोडीसी धूल मेरी धरती की मेरे वतन की’ या सदाबहार गाण्यावर या दोघींचा अतिशय सुंदर असा नृत्याविष्कार असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या दोघी तरुणी व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा ‘इन्स्टाग्राम’ वरील हा व्हिडीओ अल्पावधीतच लोकप्रिय ठरला असून तो नेटक-यांच्या पंसतीला उतरला आहे.
इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी या व्हिडीओची लिंक खाली देण्यात आली असून आपल्याला या लिंकवर क्लिक करुन सदरचा व्हिडीओ बघता येईल, सदर व्हिडीओ like करता येईल, त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येईल तसेच त्यांच्या legal_beats11या इन्स्टा पेजला follow देखील करता येईल.