इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – प्रसिद्ध चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा चांगलाच अडचणीत आला आहे. परस्त्रीसोबत गाडीत त्याच्या पत्नीने त्याला रंगेहात पकडले. त्यामुळे त्याने पत्नीवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिश्राने गाडी घातल्याने त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आपल्या पतीने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली. मिश्राची पत्नी त्याच्या घरी गेली तेव्हा तो बाहेरच गाडीत बसलेला तिला दिसला. त्याच्यासोबत एक महिला होती. आणि मिश्रा तिच्यासोबत रोमँटिक झाला होता, असं मिश्रा याची पत्नी सांगते. हे पाहून मी काचेवर टकटक केली, मात्र मला पाहून मिश्राने गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बायकोला धक्का मारला. ती खाली पडल्यावर तिच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कमल किशोर याच्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे. यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे. याप्रकरणी तसेच पत्नीच्या आरोपांवर मिश्रा याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१९ मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केले. भुतीयापा, फ्लॅट नंबर ४२०, देहाती डिस्को अशा चित्रपटांची निर्मिती मिश्रा याने केली आहे.