लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर लासलगाव बाजार समितीत शेतक-यांनी लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन कांद्या प्रश्नी मुख्यमंत्र्याबरोबर बैठक व चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुंबईला गेल्यानंतर मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतक-यांच्या मागण्या सांगितल्या. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने लासलगाव बाजार समितीमध्ये भेट दिली. कांदा भाव कोसळण्याचे कारण काय, निर्यातीतच्या अडचणी, कांद्याची सद्य परिस्थिती अशा अनेक अडचणी बाबात व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आता त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.