नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कै. निलेश सदाशिव बारेला या विद्यार्थ्याच्या वारसास विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा योजनेनुसार दीड लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. मयत विद्यार्थ्याच्या पत्नी श्रीमती कविता निलेश बारेला यांचेकडे विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांचे हस्ते हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.
कै. निलेश सदाशिव बारेला हा मुक्त विद्यापीठाच्या चोपडा येथील अभ्यासकेंद्र असलेल्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयाचा एम.ए. (मराठी) चा विद्यार्थी होता. दुर्दैवाने या विद्यार्थ्याचे गेल्या दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी अपघाती निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुक्त विद्यापीठाने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना (विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा) कार्यान्वित केलेली आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याच्या वारसांनी केलेल्या दाव्यानुसार चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडून दीड लाख रुपयांचा विमा दावा मंजुर करण्यात आला.
याप्रसंगी श्री. सदाशिव बारेला, श्री. विशाल बारेला, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार प्रमुख, शैक्षणिक संयोजक श्री. सिध्दांत टाक, पंजाब नॅशनल बँकेचे मंडल उपप्रमुख श्री. अशोक अहुजा, पंजाब नॅशनल बँक विद्यापीठ शाखेचे शाखाप्रबंधक श्री. आशिष भिवगडे, श्री. विशाल वाघ, विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री. अमोल वारे, श्री. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.
A cheque of Rs 1.5 lakh under the Student Accident Insurance Scheme