गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सीडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकसह नागपूर येथे गुन्हा दाखल…मतचोरीचे केले होते ट्विट

by Gautam Sancheti
ऑगस्ट 21, 2025 | 6:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 34


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

सेंटर फॅार स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजे सीडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकसह नागपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याद्यांचा घोळ असल्याचे सांगून काही ठिकाणी पत्रकार परिषदेतून सीडीएसच्या माहितीच्या आधारे मतचोरीचे आरोप केले होते. नाशिक येथील देवळाली विधानसभा मतदार संघ व रामटेक विधानसभा मतदार संघाबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी ही चुक परवा कबूल केली. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.

संजयकुमार यांच्या विरोधात नाशिक येथे सरकारवाडा पोलिस स्टेशन तर नागपूर येथे रामटेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते.. त्यात नाशिकमध्ये २०२४ सालच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ३२८०५३ मतदार होते. तर विधानसभा निवडणुकीत हा आकडा ४८३४५९ पर्यत वाढला असे म्हटले होते. म्हणजे हा आकडा ४७. ३८ टक्के वाढला अशी आकडेवाडी दिली होती. त्याचप्रमाणे त्याने इतर मतदार संघात अशीच आकडेवारी दिली होती.

नाशिकमध्ये गु्न्हा दाखल, ही आहे तक्रार
नाशिक येथे सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नायब तहसीलदार देवळाली मतदार संघ प्रविणा शेखर तडवी यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १० महिन्यापसून १२६ देवळाली अ.जा मतदारसंघ नाशिकचे निवडणुक विषयक कामकाज पाहत असून त्यात मतदाराची नोंदणी व नवीन मतदार नोंदणी सह इतर कामकाजाचा समावेश आहे. संजय कुमार हे राजकीय विश्लेषक असून त्यांचा Twitter अकाउंटवर नमुद पत्ता लोकनिती सीएसडीएस (Center for the study of Developing societies) मुख्यालय, नवी दिल्ली यांनी १२६, देवळाली मतदार संघ (अ.जा) मतदार संघामधील मतदार संख्येबाबत चुकीची माहीती समाज माध्यमाव्दारे खालीलप्रमाणे प्रसारीत केली आहे.
Some information of Maharashtra election
Ac no 126 Devlali
No of Voters in 2024
LS 456072
AS 288141
Decreased Voters 167931(36.82%)
@LoknitiCSDS @Csdsdelhi

मुख्य निवडणुक अधिकारी म.रा.मुबंई यांचेकडील निर्देशानुसार १२६, देवळाली मतदारसंघ (अ.जा) मतदारसंघामधील मतदार संख्येबाबत चुकीची माहीती समाजमाध्यमावर प्रसारीत केले आहे. तथापि संबधितांविरुध्द तातडीने गुन्हा नोंद करुन अनुपालन अहवाल सादर करणे बाबत मला कळविले आहे. संजय कुमार याचे विरुध्द गुन्हा नोंद करणे कामी मला प्राधिकृत करण्यात आले आहे. तथापि संजय कुमार यांनी दिनांक ११/०८/२०२५ रोजी ०९:३५ वाजता (Twitter x.com) या प्रसार माध्यमावर १२६, देवळाली मतदारसंघ (अ.जा) मतदारसंघ यांची लोकसभा निवडणुकीचेवेळी मतदार संख्या ही ४५६०७२ नमुद केलेली आहे. प्रत्यक्षात सदर मतदारसंख्या ही २७६९०२ इतकीच आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची मतदारांची सख्या ही २८८१४१ नमुद केलेली आहे. त्यामुळे श्री संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत निश्चित करण्यात आलेली मतदार संख्या ही चुकीची माहीती प्रसार मध्यमावर प्रसारीत केलेली आहे. त्या बाबत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७५ (निवडणुकीबाबत खोटी माहीती प्रसिध्द करणे), कलम ३५३(१) (बी) व कलम २१२, ३४०(१), (२), कलम ३५६ अन्वये संजय कुमार राजकीय विश्लेषक सीएसडीएस नवी दिल्ली याचेविरूध्द तक्रार आहे. या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Screenshot 20250821 061323 Drive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post

लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या ११८३ महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ…सीईओंना दिले हे आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या ११८३ महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ…सीईओंना दिले हे आदेश

ताज्या बातम्या

crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
Chandrashekhar Bawankule

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका….महसूलमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

ऑगस्ट 21, 2025
WhatsApp Image 2025 08 20 at 8.02.28 PM 1 1

पुण्यात या ठिकाणी २७७ कोटीचे दुमजली उड्डाणपुल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 21, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या ११८३ महिला कर्मचा-यांनी घेतला लाभ…सीईओंना दिले हे आदेश

ऑगस्ट 21, 2025
Untitled 34

सीडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकसह नागपूर येथे गुन्हा दाखल…मतचोरीचे केले होते ट्विट

ऑगस्ट 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011