नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये कत्तलीसाठी नेणा-या जनावरांची गाडी पकडण्यात आली. गोरक्षकांना कत्तलीसाठी आड मार्गाने जनावरांना पिकअप गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोरक्षकांनी महामार्गावर पाटणे फाट्याजवळ वाहन आडवत तपासणी केली. या तपासणीत तीन जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच उघड झाले. याप्रकरणात मालेगाव तालूका पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी २० हजाराची तीन जनावर व १० लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी असा मुद्देमाल जप्त केला.