इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी वाराणसी आईआईटी मधील आहेत. कुल्लूमधील बंजार घाटीच्या घियागी परिसरात रविवारी रात्री ८.३० वाजता हा अपघात झाला आहे. हवामान खराब असल्यामुळे बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पर्यटकांची बस दरीत पडल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. यासोबतच जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे’
हिमाचल प्रदेश के कुल्लू में टूरिस्ट वाहन के खाई में गिरने की घटना अत्यंत दुखदायी है। इस दुर्घटना में जिन्होंने अपनों को खो दिया है, उनके परिजनों के प्रति मैं गहरी संवेदना प्रकट करता हूं। इसके साथ ही घायलों की हरसंभव मदद की जा रही है। उनके शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM
— PMO India (@PMOIndia) September 26, 2022