अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील मुल्हेर जवळच्या देवठाण येथील शेतकरी चिंतामण संपत ठाकरे यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या शेतातील विद्युत पोल वरील विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्या. या तुटलेल्या तारामुळे ठाकरे यांच्या दोन म्हशी आणि एक बैल ठार झाल्याची घटना घटली. या घटनेमुळे शेतकरी ठाकरे यांचे मोठ नुकसान झाले असून, विद्युत कंपनीने या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.