नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील नगरसुल – औरंगाबाद लोहमार्गावर दत्तात्रय आश्रम जवळ रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना औरंगाबाद दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा अंदाज न आल्याने शांताराम सिताराम जाधव या ४० वर्षीय व्यक्तीला रेल्वेची धडक लागून डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजतात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.