मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. फोन थोडा काम करणे बंद झाला, तर आपण लगेच अस्वस्थ होतो. स्मार्टफोनमध्ये आपली खासगी माहिती असल्याने आजकाल सर्व युजर्स फोनवर पासवर्ड सेट करतात. पण पासवर्ड सेट केल्यानंतर तो तुम्ही विसरून गेला तर पुढे काय…पासवर्डशिवाय फोन वापरता येत नाही. अनेक जण पासवर्ड विसल्यानंतर मोबाईल दुकानात जातात आणि दुकानदार गैरफायदा घेऊन लुटतात. परंतु तुम्हाला कुठेच जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. कारण घरच्या घरी स्मार्टफोन अनलॉक करण्याच्या काही पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुगल ड्राइव्ह मॅनेजर
गुगल ड्राइव्ह मॅनेजरच्या माध्यमातून फोनमध्ये इंटरनेट सुरू असावे. गुगल अकाउंट लॉगिन असावे, जीपीएससुद्धा खुला असावा. तुमच्या फोनमध्ये ही पद्धत काम करू शकणार नाही असेही होऊ शकते. मग
१) दुसऱ्या फोन किंवा कॉम्प्युटरवरून google.com/android/devicemanager वर जा.
२) तुमच्या गुगल अकाउंटवरून साइन इन करा.
३) अनलॉक करू इच्छिणारा फोन सलेक्ट करा.
४) लॉक हा पर्याय निवडा. तुमचा नवा पासवर्ड टाइप करा.
५) तुमच्या फोनच्या स्क्रिनवर पासवर्ड विचारला जाईल. नवा पासवर्ड टाकल्याने फोन अनलॉक होईल.
फॅक्टरी रिसेटिंग
जेव्हा कोणतीही पद्धत काम करत नसेल, तर फोन रिसेट करण्याचा शेवटचा मार्ग असतो. फोन लॉक असतानासुद्धा तो फॅक्ट्री रिसेट करू शकता.
१) तुमचा फोन स्विच ऑफ करा आणि किमान एक मिनिट थांबा.
२) आता पॉवर आणि व्हॉल्युम डाउन बटन एकत्रितरित्या दाबून ठेवा.
३) त्याने फोन रिकव्हरी मोडमध्ये येईल. आता फॅक्ट्री रिसेट हा पर्याय निवडा.
४) फोन पूर्णपणे क्लिन करण्यासाठी व्हाइप कॅशचा पर्याय निवडा.
५) एक मिनिट वाट पाहा आणि त्यानंतर फोन सुरू करा.
६) आता तुम्ही पासवर्ड न टाकता तुमचा फोन वापरू शकता.