……हा भीषण अपघाताचा व्हायरल व्हिडिओ लासलगांवचा नाही

नाशिक – रेल्वे फाटकावर उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या रेल्वे फाटकावर झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ म्हणून व्हायरल केला जातोय. मात्र इंडिया दर्पणने याची पडताळणी केली असता हा व्हिडिओ लासलगावचा नसल्याचं सत्य समोर आलंय. हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील असून नेमका कधीचा आहे,  हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here