पाटणा (बिहार)- राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे राजकारण किंवा वैयक्तिक जीवन या दोन्ही क्षेत्रात त्यांच्या वेगळ्याच कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अनेक मुद्द्यांवर ते पक्षप्रमुखांनाही उघड विरोध करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशी एक सामाजिक बांधिलकीची राजधानी पाटण्यात त्यांची पाहायला मिळाली, त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
त्याचे असे झाले की, शनिवारी रात्री तेजप्रताप यांचा ताफा रस्त्यावरून जात होता. तेव्हा तेज प्रतापने एका गरीब मुलीला फुटपाथवर पेन विकताना पाहिले. त्याने आपली गाडी थांबवली आणि मुलीचे सर्व पेन विकत घेतले. दरम्यान, त्या मुलीने सांगितले की, तिचे वडील ऑटो चालवतात. ती शाळेत जात नाही तर शिकवणी घेते. तेज प्रताप यांनी तिच्या शिक्षणाविषयी चर्चा केली. तसेच त्यांनी त्या मुलीला फोन विचारला तेव्हा तिने सांगितले की, तिच्याकडे मोबाईल नाही. यानंतर त्यांनी त्या मुलीला मोबाईल शॉपीमध्ये नेले आणि ५० हजार रुपये किमतीचा आयफोन खरेदी करून दिला.
इतकेच नव्हे तर तेज प्रतापने तरुणीला मोबाईलबाबत सांगून फोनवर मन लावून अभ्यास कर.तेज प्रतापने आपला मोबाईल नंबरही मुलीला दिला आहे. याशिवाय आयफोन कसा वापरला जातो आणि तो कसा चार्ज केला जातो याचीही माहिती देण्यात आली आहे. या मुलीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
त्याचवेळी, मुलीने सांगितले की तिला आयफोन कोण देत आहे हे माहित नव्हते, त्यानंतर काही जणांनी तिला सांगितले की, लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप याने मोबाईल भेट दिला आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी तेज प्रतापने झोपडपट्टीतील चार मुलांना घरी बोलावून त्यांच्याशी गप्पा मारल्या होते. तर २०१८ मध्ये त्यांनी त्यांचा वाढदिवस गरीब मुलांसोबत साजरा केला होता.