दिंडोरी – तालुक्यातील मडकीजाम येथील रहिवासी नाशिक मनपा रुग्णालयातील ५० वर्षीय कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात ते कार्यरत होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने मडकीजाम गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे