नाशिक – अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमीपूजन समारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध काळाराम मंदिरात भव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या सभोवती दिवे पेटविण्यात आले. सुवाशिणींनी यावेळी श्रीरामाचा जयघोष केला. त्यामुळे मंदिरात अत्यंत चैतन्यमयी वातावरण तयार झाले होते.