मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पणप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील ३० हजार कामगारांच्या घरकुलाच स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते ९ जानेवारी २०१९ रोजी झाले होते.
या लोकापर्णबरोबरच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, गृहप्रदान व लाभ वितरण होत आहे. बघा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह