नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिटीसेंटर मॉल जवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी परेश अनंत आंबेवाडीकर (रा.शिव कॉलनी,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेवाडीकर बुधवारी (दि.१९) रात्री सीटी सेंटर मॉल भागात गेले होते. वाहन तळाच्या मोकळया जागेत त्यांनी आपली इरर्टीका कार पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच तोडून मागील सिटावर ठेवलेली सुमारे २५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.
तीन जणांच्या टोळक्याने युवकास केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल
आमच्या मित्राबरोबर का राहतो या कारणातून वाद घालत तीन जणांच्या टोळक्याने युवकास बेदम मारहाण केली. या हाणामारीत एकाने काही तरी हत्याराने मारहाण केल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश महाले, पवन पिठे व आदित्य सातपूते अशी युवकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मोहित संतोष जगताप (रा.गंगापूर गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जगताप बुधवारी (दि.१९) आपल्या घरपरिसरातील बसथांबा येथे थांबलेला असतांना संशयित त्रिकुटाने त्यास गाठून आमच्या मित्रा सोबत का राहतो या बाबत जाब विचारत शिवीगाळ केली.
यावेळी संतप्त टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांपैकी एकाने काही तरी हत्याराने वार केल्याने जगताप जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत.