मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या काल झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत, प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखालच्या ‘रंगकर्मी नाटक समूहाने’ मध्यवर्ती केंद्र मुंबईतल्या १० पैकी ८ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ हे दोन गट निवडणुकीच्या रिंगणात होते.
रंगकर्मी नाटक समूहातले प्रशांत दामले यांना सर्वात जास्त ७५९ मतं मिळाली, तर विजय केंकरे यांना ७०५, विजय गोखले ६६४, सयाजी शिंदे ६३४, सुशांत शेलार ६२३, अजित भुरे ६२१, सविता मालपेकर ५९१, आणि वैजयंती आपटे यांना ५९० मतं मिळाली. तर ‘आपलं पॅनल’ मधल्या सुकन्या कुलकर्णी-मोने यांना ५६७ आणि प्रसाद कांबळी यांना ५६५ मतं मिळाली. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून, आपण नाट्य परिषदेला यशाच्या शिखरावर नेऊ, असा विश्वास रंगकर्मी नाटक समूह पॅनलच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
Marathi Natya Parishad Election Result Declared