नाशिक कोरोना अपडेट- ४०१ कोरोनामुक्त. ४९१ नवे बाधित. १३ मृत्यू

नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१७ ऑक्टोबर) ४९१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४०१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८८ हजार ८६१ झाली आहे. ८० हजार १२३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार १४७ जण उपचार घेत आहेत.

शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६९, ग्रामीण भागातील १९९, मालेगाव शहरातील १२ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, १३ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५९ हजार ०८३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ०१३.  पूर्णपणे बरे झालेले – ५५ हजार ०५३. एकूण मृत्यू – ८३६.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १९४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१८

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – १६ हजार ८१४.  पूर्णपणे बरे झालेले – १२ हजार ९८३. एकूण मृत्यू – ३६५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ४६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.२२

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०३०.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ६४५. एकूण मृत्यू – १६३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.४५

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक ४५८
बागलाण १९६
चांदवड १३५
देवळा ६१
दिंडोरी २८८
इगतपुरी १३४
कळवण १०७
मालेगाव २०४
नांदगाव २५६
निफाड ५६३
पेठ ३०
सिन्नर ९१२
सुरगाणा १५
त्र्यंबकेश्वर ११५
येवला १२७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here