बघा, सावळ घाटात इको कारमधून हा साठा झाला जप्त (व्हिडिओ)

पेठ – सावळ घाटात ४ लाखाचा अवैध मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. गुजरात राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात येणारा हा मद्यसाठा आहे. जवळपास ४ लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. वाहनासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातून गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील सावळघाटात सापळा रचून तपासणी केली. वाहन क्रमांक GJ – 06 -HL-9655 यामध्ये विशिष्ट कप्पा तयार करून त्यामध्ये मद्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने  संशयीत दिलीपभाई मोतीसिग भाई वसावा (वय  33 रा. टेकडा ता. झगडीया जि. भरूच) यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here