नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या नियोजन विभागाने (रोहयो) नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक आणि सिन्नर या तालुक्यांमधील गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याकामी साडे सहा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून नाशिक तालुक्यातील ३२ तर सिन्नर तालुक्यातील २२ गावांमधील रस्तांचे काँक्रिटीकरण होणार असून लवकरात लवकर या कामांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
गावांतर्गत रस्तांचे काँक्रिटीकरण करण्याकामी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. याकामी खा. गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून गावस्तरावरील रस्त्यांची झालेल्या दुराव्यस्था विषयाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने नुकतेच नियोजन विभागाने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून नाशिक तालुक्यातील दुगांव, दरी, तिरडशेत, गंगाम्हाळुंगी, शास्त्रीनगर, आंबेबहुला, ओझरखेड, गंगावऱ्हे, गणेशगाव त्र., गणेशगांव ना, गिरणारे, गोवर्धन, गोविंदपूर, गौळाणे, चांदशी, जलालपूर, विल्होळी, सुभाषनगर, दुडगांव, पिंपळगांव गरुडेश्वर, महादेवपूर, महिरावणी, मातोरी, मुंगसरे, यशवंतनगर, राजेवाडी, रायगडनगर, लोहशिंगवे, वंजारवाडी, वासाळी, शिवनगांव, सावरगांव येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून प्रत्येक गावासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. सिन्नर तालुक्यातील कणकोरी, खडांगळी, घोटेवाडी, जायगांव, देशवंडी, दोडी खु, पिंपळगावं, पिंपळे, वडगाव, वडझिरे, हिवरगांव, गोंदे, सांगवी या गावांमध्ये काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉकसाठी प्रत्येकी विस लाखांचा निधी तर डुबेरे, देशवंडी, ब्राम्हणवाडे येथील स्मशानभूमी, मोहू, चास, वाडझिरे, खापराळे, खापराळे जि.प. शाळा पटांगण या कामांसाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.