भारतातील ५८ टक्के कर्मचारी करताय वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली – भारतातील 52 टक्के कर्मचारी आणि व्यवस्थापन स्तरावरील 64 टक्के कर्मचारी म्हणजे सरासरी 58 टक्के लोक हे वर्क फॉर्म होम (घरबसल्या काम) करण्याच्या नवीन मार्गाला प्राधान्य देत आहेत. असे एका जागतिक अभ्यासानुसार असे निष्पन्न झाले आहे.
       कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू झाल्यानंतर बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्मचारी या नवीन पद्धतीच्या वातावरणात काम करत आहेत .सर्व्हिस नाऊ या  कंपनीने 1 ते 10 सप्टेंबर एक सर्वेक्षण  दरम्यान केले. त्यात असे निर्देशानास आले की, सध्या घरून काम करण्यास कर्मचारी प्राधान्य देत आहेत.  कॉर्पोरेट कर्मचार्‍यांमधील कामाचे सर्वेक्षण   हे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड्स, भारत, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील 500 हून अधिक कंपन्यांमधील 8,100 ऑफिस प्रोफेशनल्समध्ये  करण्यात आले.  याशिवाय सीईओ, सीटीओ, सीएफओ (सी-सुट) इत्यादी या कंपन्यांच्या जवळपास 900  प्रमुख कॉर्पोरेट अधिकाऱ्यांनीही यात भाग घेतला.
 या सर्वेक्षणात मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, फायनान्स सर्व्हिसेस, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि टेलिकॉम इंडस्ट्रीजमधील सुमारे 1 हजार कर्मचारी आणि 100 व्यवस्थापन स्तरावरील प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.  सर्वेक्षणानुसार, भारतातील लोकांनी हा डिजिटल बदल स्वीकारला आहे आणि देशात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 सर्व्हिस नाऊचे व्यवस्थापकीय संचालक  अरुण बाल सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, भारतातील  सुमारे 74 टक्के अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की, त्यांचे ऑनलाईन कामही सुरू आहे.  सर्वेक्षण केलेल्या इतर देशांमध्ये, हे अमेरिकेत 89 टक्के, ब्रिटनमध्ये 98 टक्के आणि ऑस्ट्रेलियामध्ये 98 टक्के आहे.  हा प्रकार देशातील डिजिटल कामकाजास अधिक योग्य मान्यता दर्शवतो. परंतु त्याच वेळी या क्षेत्रात आणखी बरेच काही सुधारणा करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here