पुन्हा संभ्रम…. खडसेंचा सीमोल्लंघनाचा मुहूर्त टळला

जळगाव – भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त तूर्त तरी टळला आहे. या विषयावर खडसे यांनी नो कॅामेंटस अशी प्रतिक्रिया देत बोलणे टाळले आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी सुध्दा या प्रवेशाबाबत माहित नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे खडसे यांच्या प्रवेशाबाबत आता पुन्हा संभ्रम सुरु झाला आहे. दरम्यान खडसे यांनी हा मुहूर्त माध्यमांनी ठरवल्याचे सांगितले आहे.

खडसे यांच्या प्रवेशाबाबत महाविकास आघाडीत असलेल्या घटक पक्षातही खलबंत सुरु झाली आहे. त्यात शिवसेनाचा खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध आहे. पण, ते उघडपणे त्यावर बोलत नाही. जळगाव जिल्हयाच्या स्थानिक पातळीवर शिवसेना व खडसे यांचे वैर सर्वश्रूत आहे. त्यांच्या विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे कट्टर विरोधक आहे. जळगाव मधील शिवसेनेचे नेते सुरेश जैन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खडसे बरोबर जमत नाही. त्यामुळे खडसे मंत्री झाले तर भाजपपेक्षा येथे शिवेसनेची अडचण मोठी आहे. त्यामुळे हा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

प्रवेश निश्चित, पण मुहूर्त निघेना

खडसे यांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे समर्थकही त्याबाबत उघडणपणे आता बोलू लागले आहे. पण, मुहूर्त केव्हा हे त्यांना माहित नाही. त्यामुळे खडसेंचा हा प्रवेश का लांबला याबाबत आता संभ्रम आहे. त्यामागची कारणे अजूनही गुलदस्त्यात असून त्यावर दोन्ही बाजूने मौन पाळले जात आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here