मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युथ ज्युनिअर व सिनियर गटाच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पोंजेसली कॉलेज नागरकोईल तामिळनाडू येथे २८ डिसेंबर ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याने चुरशीची स्पर्धा होणार असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी व भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची निवड केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची वीणाताई संतोष आहेर, संध्या भास्कर सरोदे, के आर टी विद्यालयाचा साइराज राजेश परदेशी, छत्रे विद्यालयाची मेघा संतोष आहेर, राष्ट्रीय खेळाडू पूजा राजेश परदेशी यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.