नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरुळ येथील द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम आता कायमस्वरुपी बंद होणार आहे. कारण, संपूर्ण राज्याला हादरा देणारे अल्पवयीन बालिकांचे लैंगिक शोषणाचा गंभीर प्रकरण या आधाराश्रमात उजेडात आले आहे. रो हाऊसमध्ये चालणारा हा आधाराश्रम बेकायदा आहे. तो सध्या सील करण्यात आलेला असला तरी तो कायमस्वरुपी बंद करण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.
लैंगिक शोषण प्रकरणात अटक केलेल्या हर्षल मोरे याची मंगळवारी (दि.६) पोलिस कोठडी संपली. त्यामुळे त्यास पुन्हा आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रम विश्वस्तांची पोलिसांनी कसून चौकशी केली असून पीडितांसहित नातेवाइकांची जबाब नोंदणी पूर्ण झाली आहे. या चौकशीदरम्यान पोलिसांनी आश्रमाच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली. यावेळी बºयापैकी महत्त्वाची आणि तपासाकरीता अत्यावश्यक कागदपत्रे विश्वस्तांना सादर करता आलेली नसल्याने आता मोरे याच्या कोठडीत पुन्हा वाढ होणार की अन्य गुह्यात त्यास अटक केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हसरूळ येथील द किंग फाऊडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात अनेक आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याप्रमाणे नराधम संस्थाचालक हर्षल मोरे याची प्रत्येक गुन्ह्यात अटक होऊन स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. सन २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२२ या काळात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांनी केलेल्या तपासात संशयिताच्या सटाणा येथील घरातून एअरगन हस्तगत करण्यात आली आहे. ही गन पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली असून, पीडितांच्या जबाबांचेही रेकॉर्डिंग पूर्ण झाले आहे. यामुळे या गुन्ह्यांमधील मोरे संदभार्तील पुराव्यांचा फास अधिकाधिक घट्ट होत आहे.
पोलिसांनी हा आश्रम सील केला असून, सर्व विद्यार्थिनींना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. सटाणा येथील मोरेच्या कुटूंबियासह नातेवाइक आणि आजूबाजूंच्याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान, सातही गुन्ह्यांतील पुरावे आणि जबाबनिहाय साखळी जोडण्याचे काम पोलिस करीत आहेत. संस्थेच्या विश्वस्तांचीही चौकशी करून जबाबनोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र, अत्यावश्यक कागदपत्रे पोलिसांना विश्वस्तांनी सादर केलेली नाहीत. यामुळे हा बेकायदेशीर आश्रम आता पूर्णत: नष्ट होण्याचा मार्गावर आहे.
Nashik Crime Aadharashram Harshal More Rape
Police Action Molestation