साकोरे फाट्यावरील कार सॅनिटायझरमुळे पेटली? (बघा व्हिडिओ)

नाशिक – पिंपळगाव बसवंतपासून जवळच असलेल्या साकोरे फाटा येथे कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना सॅनिटायझरमुळे झाली असल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. कार आतमधून सॅनिटाईज केलेली होती. सॅनिटायझरने उन्हाच्या चटक्याने पेट घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र, कोरोनापासून बचाव योग्यच पण अतिरेक नको असे संदेश आता सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. सॅनिटायझरचा वापर केला तरी योग्य ती खबरादारी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे.

पहा बर्निंग कारचा हा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here