नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या आत्महत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या तीन पैकी दोन आत्महत्या म्हसरूळ व चेहेडी पंपिंग परिसरात झाल्या तर तिसरी घटना ही गंगापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या चहाच्या टपरीजवळ घडली.
या आत्महत्यापैकी गंगापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या चहाच्या टपरीजवळ आत्महत्या केलेल्या तरुणांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली केली. विजू जाधव (रा. धात्रक फाटा, नाशिक) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जाधव याने आत्महत्या केल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
होते. दुसरी घटना चेहेडी पंपिंग परिसरातील पेरूच्या बागेत झाली. येथे अज्ञात युवकाने गळफास घेऊन ही आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती विशाल विजय ताजनपुरे (रा. चेहेडी पंपिंग) यांनी दिली. शनिवारी त्यांच्या पेरूच्या बागेत २० ते २५ वयोगटातील अज्ञात युवकाने पेरूच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. तिसरी घटना निर्मलनगर मेरी म्हसरूळ परिसरात येथे घडली. येथील २२ वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. अजय विष्णू घोडके असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या तरुणाला आईने आडगाव वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला.