दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मानोरी शिवारात पहाटे शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या “शिवकथल” बंगल्यामध्ये पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. या चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना पिस्तुल व चाकूचा धाक दाखवला.
त्यानंतर घरातील २८ तोळे सोन्याचे दागिने, ४८० ग्रम चांदी असा ८ लाख ५० हजार रुपये रक्कम चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उप अधीक्षक भोसले, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ ,दिंडोरी पो. ठाणे व स्टाफ, फिंगर प्रिंट ब्युरो, डॉग युनिट, तांत्रिक विश्लेषण शाखा अशा तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून शोध सुरू आहे.