मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमातील विद्यार्थिनींनी आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले या आधाराश्रमामध्ये राहतात. विद्यार्थिनींनी राखी बांधताच, मुख्यमंत्री म्हणाले की, अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये असा मनोमन संकल्प केला. बघा हा व्हिडिओ
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आज त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधारआश्रम ट्रस्ट या संस्थेतील राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी मला विधानभवनात राखी बांधली. त्यांच्याकडून राखी बांधून घेताना पुन्हा अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये असा मनोमन संकल्प केला.#रक्षाबंधन pic.twitter.com/e6q8ZgvjcK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 11, 2022
Nashik Aadhartirtha Students CM Shinde Rakhi Video