कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एका धान्य गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत अवैधरित्या काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा धान्य साठा जप्त केला आहे. कळवण-देवळा रोडवरील जोगेश्वरी नामक गोडाऊनवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. काळ्या बाजारात विक्रीसाठी धान्य ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या छाप्यात गहू आणि तांदळाचा जवळपास ९ लाख ६० हजाराचा साठा आणि ट्रक असा २४ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय मालपुरे या धान्य व्यापा-याविरोधात कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalwan Ration Grains Seized Crime Nashik Rural Police Truck Black Market