इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात प्रत्येक जण ऐहिक सुखामागे धावत असतो, त्याकरिता पैसे व धनसंपत्ती मिळवण्यासाठी रात्रंदिवस देण्यात प्रयत्न करतो, परंतु या समाजात असे काही स्त्री – पुरुष आहेत की ते या सर्व सुखांपासून दूर जात धार्मिक व आध्यात्मिक जीवनात रममाण होतात, दर बारा वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक साधू, महंत आणि तपस्वी आपल्याला दिसतात त्यातील अनेक जण सर्व सुखाचा त्याग करून धर्मकार्यात कर्म कार्याकडे वळलेले असतात. जैन समाजात देखील असे काही स्त्री पुरुष आहेत की, त्यांनी सर्व सुखाचा त्याकरिता धर्मकार्य स्वीकारले आहे.
संयमश्रीजी महाराज साहेब म्हणजेच पूर्वीच्या दिक्षा बोरा यांचा संन्यासघेण्या अगोदरचा जीवन प्रवासही आगळा-वेगळा आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुख व व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा जॉब ऑफर करताना तब्बल नऊ कोटीचे पॅकेज देण्याचे कबूल केले. मात्र ही संधी न स्वीकारता त्यांनी संन्यास घेणेच पसंत केले.
उच्च शिक्षित, श्रीमंत, सर्व सुखसुविधा असूनही तरूण वयात संन्यास घेतला. जळगावच्या दिक्षा बोरा आणि आताच्या संयमश्रीजी महाराज असे या तरुणीचे नाव आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी 2013 ला जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून त्यांनी निश्चय केला की, मला संन्याशी जीवन जगायचे आहे. परंतु यासाठी घरच्यांची परवानगी हवी होती आणि घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
दिक्षा बोरा यांनी घराच्यांच्या संमतीने अखेरीस दि. 9 डिसेंबर 2019 रोजी धर्मप्रचारासाठी वयाच्या 22 व्या वर्षी संन्यास घेऊन स्वतःला झोकून दिले. दिक्षा बोरा अताचे संयमश्रीजी महाराज यांना BBA मधून पुणे येथून आपल शिक्षण पूर्ण केलं आहे. दिक्षा बोरा या राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहेत. तसेच शिक्षण घेत असताना क्रीडा, वादविवाद, कला, गायन, संभाषण आधी प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
महाराज साहेब म्हणाल्या की, जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते. आणि आनंद गुरूच्या चरणी मिळतो म्हणुन मी ठरवले मला माझ्या गुरूच्या चरणी जायचं. नऊ कोटींचा आकडा ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटते परंतु मला अजूनही वाटत नाही की, मी नऊ कोटी रुपये सोडून आले. पैशा मागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिक्षा बोरा आताच्या संयमश्रीजी महाराज साहेब त्यांनी व्यक्त केली.
9 crore salary package reject now she become sanyasi Jalgaon Diksha Bora Jain