पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – जर तुम्ही आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका. आजच अर्ज करा. ही संधी नेमकी काय आहे, जागा किती आणि अर्ज कसा करायचा याबाबत आपण आता सविस्तर जाणून घेऊया..
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच याअंतर्गत एकूण 91 पदांची भरती करण्यात येणार आहे. सुतार, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स – मेकॅनिक, मशीनिस्ट आणि प्लंबर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2022 असून शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट npcil.nic.in वर जावे लागेल आणि अधिसूचना वाचावी लागेल.
अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतर, उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अधिसूचनेत काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल, त्यामुळे हे लक्षात ठेवावे की,NPCIL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुतार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी या ट्रेडमध्ये ITI पास प्रमाणपत्रासह 8 वी पास असणे आवश्यक आहे. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेडमध्ये 10वी पास आणि आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रिशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान आणि गणित विषयांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबत इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असावे. याशिवाय, उमेदवार इतर पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच, उमेदवारांनी लक्षात ठेवा की विविध पदांसाठी वयोमर्यादा अधिकृत वेबसाइटवर देखील तपासली जाऊ शकते. त्याच वेळी, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना वेबसाइटला भेट द्यावी.