भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातून ३१ मे रोजी ८६ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत या कर्मच्या-यांना रेल्वेतर्फे तात्काळ २४ कोटी रुपये ऑनलाईन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती निमित्त रेल्वेतर्फे व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचा-यांचा यथोचित सन्मान व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे करण्यात आला. तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर, खंडवा,चाळीसगाव, भुसावल, बडनेरा,मनमाड, अकोला इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. तसेच मंडल रेल प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचा-यांना सहाय्यक कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांच्या हस्ते पी.पी.ओ फोंल्डर देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.
सेवानिवृत्ती बद्दल कर्मचा-यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता व अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे धन्यवाद मंडल कार्मिक अधिकारी दिलिप खरात यांनी केले.