इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील एका दर्ग्यानजिक शिकवणीसाठी गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर एका ५२ वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मुलीने घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी त्या आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याची गर्दीतून सुटका केली. मुलीच्या वडिलांनी हाफिजविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किष्णी नजिक एका खेडेगावात एक ८ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत उर्दू शिकण्यासाठी गेली होती. तेथे हाफिज जमाल अहमद (रा. बाराबंकी) याने त्याच्या मित्राला आमिष दाखवून घराबाहेर पाठवले. यानंतर ८ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने तिच्या मैत्रिणीला संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर मैत्रिणीने घरी जाऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. दरम्यान कुटुंबीयांनी पीडित मुलीची विचारपूस केली असता, तिने सांगितले की, हाफिजने तिला शपथ दिली होती की, ती तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देणार नाही. अन्यथा सर्वांच्या जीवाला धोका होईल, या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी थेट दर्ग्यात जाऊन आरोपी हाफिजला पकडून बेदम मारहाण केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठवले. सदर आरोपी गेल्या ९ वर्षांपासून दर्गामध्ये राहून मुलांना उर्दू शिकवत आहे. पोलीस चौकशीत या आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देत सैतान आपल्या शरीरात आल्याने हे कृत्य घडल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्यासोबत ही अशी घटना घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. सदर आरोपीचे नातेवाईक बाराबंकी येथे राहतात. त्यांचा एक मुलगा ६ महिन्यांपूर्वीच गावात आला होता आणि तो आरोपींसोबत राहत होता. मात्र बलात्कार झाला तेव्हा तो मुलगा घराबाहेर होता.