नवी दिल्ली – कोणत्याही महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. परंतु काही महिला या स्थितीतही जिद्द आणि मेहनीच्या जोरावर कठीण परिस्थितीला मात देत यशस्वी होतात. नायजेरियाची एथलिट अमिनत इदिरस यांनी अशीच एक कामगिरी करून दाखवली आहे.
आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय अमिनत यांनी देशात दर दोन वर्षांनी होणार्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवात तायक्वांडोमध्ये सुवर्णपदक जिंकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमिनत यांनी एका स्पर्धेत मिक्स्ड पोमासे गटात ही कामगिरी केली आहे. आयोजकांनी ही माहिती देताना अमिनत यांचे यश इतरांना प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे त्यांनी काही नॉन कॉम्बॅट गटातही पदक मिळविले आहेत.
काही डावपेच दाखविणारा व्हिडिओ अमिनत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. माझ्यासाठी हे मोठे यश आहे. मी काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मला सुखद धक्का बसला आहे. गर्भवती होण्यापूर्वी मी नेहमीच आनंदाने प्रशिक्षण घेत होते, असे अमिनत यांनी या यशानंतर सांगितले.
कौतुक अन् टीकाही
दरम्यान, अमिनत यांच्या यशाचे कौतुक होत असताना काही लोकांना त्यांची ही कृती योग्य वाटली नाही. शेवटच्या क्षणी स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. त्यांचे यश प्रेरणादायी असण्यापेक्षा दुःखद आहे, अशी टीका एका ट्विटर युजरने केली आहे. तर असे काही लोक स्वतःसह वैद्यकीय स्टाफलाही समस्येत टाकून मानसिक ताण निर्माण करतात असे एका ट्विटर हँडलने म्हटले आहे.
https://twitter.com/nsf_edo/status/1379175283056648197