नाशिक – तालुक्यातील प्रत्येक गाव प्रकाशमय करायचेच या खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आर.ई.सी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतुन लोकसभा मतदार संघातील गावांमध्ये १६५० सौर पथदिप बसविण्यात येणार असून नाशिक तालुक्यातील ७७ गावांमध्ये ६७१ सौर पथदिप बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.ऐन पावसाळ्यात गावे प्रकाशमय होत असल्याने नाशिक तालुक्यातील ग्रामस्थांकडून खासदार गोडसे यांच्या कामगीरी विषयी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामिण भागात सतत विजेच्या तुडवठा असल्याने येथील रहिवाशांचे जनजीवन उंचावण्यासाठी सौर पथदिप हा उत्तम उपाय ठरणार असल्याची माहिती खा . गोडसे यांनी दिली .
नाशिक , इगतपुरी , सिन्नर आणि त्रंबकेश्वर या तालुक्यांमधील ग्रामिण भागात सतत विज पुरवठा खंडीत होत असतो.यामुळे तासनतास रहिवाशांना अंधारात राहावे लागते. विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित राहावे लागते. पावसाळयात तर अनेक दुर्देवी घटनांचा रहिवाशांना सामोरे जावे लागते.यामुळे ग्रामिण भागात सौर पथदिप बसवावेत अशी मागणी सतत विविध गावांमधील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळांकडून खा . गोडसे यांच्याकडे होत होती.ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची मागणी न्यायिक असल्याने प्रत्येक गावात सौर उर्जेवर चालणारी पथदिपे बसविण्यासाठी खा. गोडसे यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले होते.खा.गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आर.ई.सी कंपनीने त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून २ कोटी ५७ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या निधीतून आता तीन तालुक्यांमध्ये १६५० पथदिपे बसविण्यात येणार आहे .पैकी नाशिक तालुक्यातील ७७ गावांमध्ये ६७१ सौर पथदिपे बसविण्याचे काम प्रत्यक्षपणे सुरू झाले आहे.यामुळे खा.गोडसे यांच्या प्रयत्नांतून नाशिक तालुका आता प्रकाशमय होणे सुरू झाले आहे.एक सौर पथदिपला ७५ वॅट चा सौर पॅनल असणार असून तो बॅटरीला चार्ज करतो . दिवसाच्या सुर्य प्रकाशामुळे बॅटरी चार्ज होते.अंधार झाला की सौर पथदिपे आपोआपच सुरू होते.७५ वॅटच्या सौर पॅनलवर १२ वॅट क्षमतेचा एलईडी लाईट रहिवाशांना सतत प्रकाश देणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.गावोगावी सौर पथदिपे बसविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने नाशिक तालुकावासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.