भुवनेश्वर – चक्रीवादळ ‘यास’चा धुमाकूळ सुरू असतानाच ओडिसामध्ये ७५० पेक्षा जास्त मुले जन्माला आली आहेत. या सर्व बालकांचे बारसे सध्या साजरे होत आहे. चक्रीवादळाचेच नाव आपल्या बालकांना देण्यासाठी पालक आग्रही आहेत.
मंगळवार ते बुधवार दरम्यान यास या चक्रीवादळाने पूर्व किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दोन दिवस या वादळाचा तडाखा बसत असतानाच ओडासामध्ये ७५० मुलांचा जन्म झाला आहे. या मुलांचे नाव आता ‘यास’ हेच राहणार आहे.
बालासोरच्या सोनाली मॅटी म्हणाल्या की, ‘यास’ पेक्षा चांगले नाव मला माझ्या मुलासाठी सापडत नाहीय. तसेच केंद्रपाराच्या सरस्वती बैरागी यांना सुद्धा तिच्या नवजात मुलीला यास नाव द्यावे, अशी इच्छा आहे. जेणेकरुन प्रत्येकजण तिच्या जन्माची वेळ आठवेल. तसेच त्याच्यासाठी ही फार आनंदाची बाब असेल की ज्या दिवशी त्याची मुलगी जन्माला येईल, त्या दिवसाची आठवण सर्व जगाला होईल.
राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना असे आढळले की, राज्यातील बर्याच भागांतील लोकांनी ‘यास ‘ असे मुलाचे नाव दिले आहे. चक्रीवादळ यास हा एक पारसी शब्द असून त्याचा अर्थ चमेली आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, समुद्र किनाऱ्यालगतच्या ६ हजार ५०० गर्भवती महिलांना मदत शिबिरात हलविण्यात आले.
ज्या महिला गर्भधारणेच्या अंतिम टप्प्यात होते त्यांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातील अनेकांनी निवारा गृहात मुलांना जन्म दिला. सरकारी आकडेवारीनुसार, बालासोर जिल्ह्यात वादळाच्या काळात १६५ मुले जन्माला आली असून त्यात ७९ मुले आणि ८६ मुली आहेत. त्यानंतर, भद्रकमध्ये ६० मुले जन्मले असून ३७ मुलगे आणि २३ मुली यांचा जन्म झाला आहे.