अहमदाबाद – बॉलीवुड मधील काही अभिनेत्री या वयाच्या 45 वर्षानंतर आई झालेल्या आहेत परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये एक वयोवृद्ध महिला वयाच्या 70 व्या वर्षानंतर आई बनली आहे याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. की हे कसे काय घडले ?
गुजरातमधील एका महिलेने जगातील सर्वात वृद्ध आई असल्याचा दावा केला आहे. जीवनबेन राबडी ( 70 ) आणि त्यांचे पती मालधारी (75) यांनी अभिमानाने आपले बाळ दाखवले. या जोडप्याने सांगितले की, मुलाचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे. राबडी आणि मालधारी हे गुजरातमधील मोरा या छोट्या गावाचे रहिवासी आहेत. वास्तविक त्यांच्याकडे त्या काळातील म्हणजे वय वर्ष 70 असल्याचा कोणताही जन्म दाखला किंवा ओळखपत्र नाही. परंतु त्यांनी सांगितले की, त्या 70 वर्षांचे आहेत.
रबरी आणि मालधारी यांचा 45 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आता लग्नाच्या 45 वर्षानंतर बाळाच्या आगमनामुळे त्यांच्या घरातच नव्हे तर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात डॉ नरेश भानुशाली यांनी जोडप्याला स्पष्टपणे सांगितले होते की, म्हातारपण आणि काही अडचणींमुळे मुलाला जन्म देणे अवघड आहे, पण या जोडप्याने देवावर विश्वास ठेवला आणि हे अशक्य आणि कठीण काम शक्य आणि सोपे झाले. आता 70 वर्षीय महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे.
यापुर्वी 2009 मध्ये, जगातील सर्वात वृद्ध आई होण्याचा विक्रम इंग्लडच्या एलिझाबेथ अॅडेनीच्या नावावर होता, तिने मे 2009 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म फक्त IVF तंत्राने झाला. तेथे तेव्हा 50 वर्षांवरील महिलांसाठी आयव्हीएफ सुविधा नव्हती, त्यामुळे एलिझाबेथला युक्रेनला जावे लागले. तथापि, आणखी एक भारतीय महिला, इरामती मंगयम्मा ही प्रथमच सर्वात वृद्ध आई बनली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये, वयाच्या 74 व्या वर्षी तिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता, असे म्हटले जाते.