गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशात ७ टेक्स्टाईल पार्क, ४४४५ कोटींची गुंतवणूक, २१ लाख रोजगार

ऑक्टोबर 7, 2021 | 11:51 am
in राष्ट्रीय
0
textile

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योग नकाशात भारताला समर्थपणे स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 7 पीएम-मित्र अर्थात भव्य एकात्मिक वस्त्र विभाग आणि प्रावरणे केंद्रांच्या (टेक्स्टाईल पार्क) उभारणीला मंजुरी दिली आहे. या ७ पार्कमध्ये एकूण ४४४५ कोटींची गुंतवणूक होणार असून तब्बल २१ लाख रोजगार निर्माण होणार आहे.

पीएम-मित्र केंद्रे पंतप्रधानांच्या 5 एफ संकल्पनेपासून प्रेरित आहेत. ही 5 एफ संकल्पना म्हणजे शेतकरी ते धागे बनविणे ते फॅक्टरी ते फॅशन ते परदेश निर्यात अशी पाच सूत्रे होय. अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आणखी वाढीसाठी ही एकात्मिक संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही इतर प्रतिस्पर्धी देशाकडे आपल्या देशासारखी परिपूर्ण वस्त्रोद्योग परिसंस्था अस्तित्वात नाही. भारत हा या सर्व 5 एफ सूत्रांच्या बाबतीत सशक्त आहे.

या सात महा एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र व परिधान उद्यानांची (PM MITRA) स्थापना विविध इच्छुक राज्यांमधील ग्रीन आणि ब्राऊन फील्ड क्षेत्रात केली जाईल. ज्या राज्यांमध्ये विद्यमान वस्त्रोद्योग परिसंस्थेच्या लगत एक हजार एकरांहून मोठा व विनापाश भूखंड उपलब्ध असेल, त्या राज्यसरकारांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

ग्रीनफील्ड क्षेत्रातील सर्व पी एम मित्र साठी जास्तीत जास्त 500 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ ( DCS) आणि ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पी एम मित्र साठी जास्तीत जास्त 200 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) सामायिक पायाभूत विकासासाठी (एकूण प्रकल्प खर्चाच्या 30%) दिले जाणार आहे. पी एम मित्र मध्ये लवकरात लवकर वस्त्रोद्योग सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 300 कोटी रुपयांचे स्पर्धात्मकता प्रोत्साहन पाठबळ(CIS) दिले जाणार आहे. राज्यात जागतिक स्तराचे उद्यम नगर स्थापित करण्यासाठी इतर प्रोत्साहनांबरोबरच राज्य सरकारतर्फे 1000 एकर जमीन दिली जाईल.

ग्रीनफील्ड ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पी एम मित्र साठी भारत सरकारचा विकास भांडवली निधी (DCS) एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के परंतु जास्तीत जास्त 500 कोटी रुपये दिला जाईल. ब्राऊनफील्ड क्षेत्रांसाठी, मूल्यमापनानंतर, प्रकल्पातील विकासाधीन असलेल्या पायाभूत सुविधा व प्रकल्पाला सहाय्य्यभुत असलेल्या इतर सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाच्या 30 टक्के, व जास्तीत जास्त 200 कोटी रुपयांपर्यंत विकास भांडवली निधी (DCS) दिला जाईल. खाजगी गुंतवणूकदारांसाठी हे प्रकल्प अजून आकर्षक करण्यासाठी हा निधी वायेबिलिटी गॅप फंडिंग चे काम करेल.

पी एम मित्र उद्यानात खालील गोष्टी असतील :
महत्वाच्या पायाभूत सुविधा: इन्क्युबेशन केंद्र, प्लग अँड प्ले सुविधा, कारखान्यांसाठी विकसित जागा, रस्ते, वीज पुरवठा, पाणीपुरवठा व सांडपाणी विल्हेवाट यंत्रणा, कॉमन प्रोसेसिंग हाऊस, CETP आणि इतर संबंधित सुविधा, उदा. डिझाईन सेंटर, टेस्टिंग सेंटर, इ .
पूरक पायाभूत सुविधा: कामगारांसाठी हॉस्टेल आणि घरे, लॉजिस्टिक पार्क, गोदामे, वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्रे.
पीएम मित्र योजना उत्पादन उपक्रमांसाठी 50% क्षेत्र, सोयीसुविधांसाठी 20% क्षेत्र आणि व्यावसायिक विकासासाठी 10% क्षेत्र विकसित करेल.
मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र आणि परिधान पार्क्सचे मुख्य घटक * ने 5% क्षेत्र तर संबंधित उद्देशासाठी वापरण्यात येणारे 10% क्षेत्रने दर्शवले आहे.

पीएम मित्र पार्क हे SPV द्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी ) पद्धतीने विकसित केले जाईल, हे पार्क राज्य सरकार आणि भारत सरकारच्या मालकीचे असेल.मुख्य विकासक केवळ औद्योगिक पार्कचाच विकास करणार नाही तर मक्ता असलेल्या काळात त्याची देखभालही करेल. राज्य आणि केंद्र सरकारांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित या मुख्य विकासकाची निवड होईल.

राज्य सरकारची बहुसंख्य प्रमाणात मालकी असेलल्या SPV ला, विकसित औद्योगिक स्थळांकडून भाडेतत्त्वावरील भाडे मिळवण्याचा हक्क असेल आणि पीएम मित्र पार्कचा विस्तार करून, कामगारांसाठी कौशल्य विकास उपक्रम आणि इतर कल्याणकारी उपाय प्रदान करण्यासह या क्षेत्रातील वस्त्रोद्योगाच्या पुढील विस्तारासाठी हे भाडे या संस्थेला वापरता येईल.

उत्पादन युनिट्सची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने, भारत सरकार प्रत्येक पीएम मित्र पार्कसाठी 300 कोटी रुपयांचा निधी देखील प्रदान करेल. याला स्पर्धात्मकता प्रोत्साहन पाठबळ (सीआयएस) म्हणून ओळखले जाईल आणि पीएम मित्र पार्कमधील नव्याने स्थापन झालेल्या युनिटच्या उलाढालीच्या 3% पर्यंत निधी दिला जाईल. नवीन प्रकल्पासाठी असे पाठबळ उत्पादन वाढवण्यासाठी तसेच खर्च वसुली पूर्ण होईपर्यंत, व्यवहार्यता स्थापित करण्याच्या दृष्टीने आस्थापनाअंतर्गत महत्त्वपूर्ण आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अन्य योजनांशी एककेंद्राभिमुखता त्यांच्या योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध आहे.यामुळे वस्त्रोद्योगातील स्पर्धात्मकता वाढेल, अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य करण्यात मदत होईल आणि लाखो लोकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन झालेल्या लाभामुळे ही योजना भारतीय कंपन्यांना जगज्जेते म्हणून उदयाला येण्यास मदत करेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रसारण आता या चॅनल्सवरही

Next Post

जेव्हा पालकमंत्री छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला जातात (बघा व्हिडीओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20211007 WA0162 e1633595213802

जेव्हा पालकमंत्री छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला जातात (बघा व्हिडीओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011