पुणे – दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता किआ ही कंपनी भारतीय बाजारात चांगली कामगिरी करत आहे. ही कंपनी या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये आपल्या वाहनांच्या विस्तृत श्रेणीवर बंपर सवलत देत आहे, याचा ग्राहकांना सर्वात मोठा फायदा कंपनीच्या लोकप्रिय ७-सीटर एमपीव्ही किया कार्निवलमध्ये झाला आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक ३.७५ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
प्रीमियम किया कार्निवलमध्ये बेस व्हेरिएंट विशेष बेनिफिट पॅकेजसह दिले जात आहे. इच्छुक खरेदीदार प्रीमियम ट्रिमवर पूर्ण ३.७५ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या विशेष योजनेसह, कार्निवल एमपीव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत फक्त २१.२० लाख रुपये आहे.
किया कार्निव्हलवरील या विशेष लाभ पॅकेजमध्ये २.५० लाखांची रोख सवलत तसेच 1.२५ लाख रुपयांची अतिरिक्त ऑफर समाविष्ट आहे. त्यामध्ये विस्तारित वॉरंटी पॅकेज, वार्षिक देखभाल आणि इतर फायदे समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ग्राहक ३.७५ लाख रुपयांची रोख सवलत मिळवणे देखील निवडू शकतात. किया कार्निवल प्रेस्टीज आणि लिमोझिन ट्रिमवर २.५० लाखांची रोख सवलत दिली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, किआ कार्निवल प्रीमियम ७-सीटर स्वयंचलित व्हेरिएंटची किंमत २१.२० लाख रुपये आहे, टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या व्हीएक्स मॅन्युअल व्हेरिएंटपेक्षा स्वस्त आहे.
किआ इंडिया कार्निवल ग्राहकांसाठी विशेष ‘समाधान हमी योजना’ देखील देत आहे. या योजनेअंतर्गत, नवीन किआ कार्निव्हलचे ग्राहक देखील त्यांच्या कारवर समाधानी नसल्यास त्यांना कार परत करू शकतात. यासाठी ग्राहकांना खरेदीच्या ३० दिवसांच्या आत कार परत करावी लागते. त्यानंतर कंपनी एक्स-शोरूम किंमतीच्या ९५ टक्के तसेच वाहनाची नोंदणी आणि वित्तपुरवठा करण्यासाठी ओव्हरहेड खर्च परत करेल.
किया कार्निवलमध्ये कंपनीने २.२ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन वापरले आहे, कार्निवल किआ ही यूव्हीओ कनेक्टेड कार तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कार तीन वेगवेगळ्या आसन पर्यायांसह येते, त्यात ७ सीट, ८ सीट आणि ९ सीट यांचा समावेश आहे. किआ कार्निव्हलच्या ७-सीटर व्हेरिएंटला मधल्या ओळीत स्टँडर्ड कॅप्टन सीट्स असून याशिवाय, 8-सीटर मॉडेलमध्ये ४ कॅप्टन सीट्स येतात, तर ९-सीटर व्हर्जनमध्ये ६ कॅप्टन सीट्स असतात. ७-सीटर व्हेरिएंटला लक्झरी व्हीआयपी कॅप्टन सीट्स मिळतात.